Posts

उद्धव ठाकरे व काँग्रेस यांच्या महानगर निवडणुकीत पराभवाला धर्मद्वेष-भाषाद्वेष कारणीभूत ठरला -किशोर तिवारी

Image
उद्धव ठाकरे व काँग्रेस यांच्या महानगर निवडणुकीत पराभवाला  धर्मद्वेष-भाषाद्वेष कारणीभूत ठरला -किशोर तिवारी  दिनांक -१८ जानेवारी २०२६ महानगर निवडणुकीत नळ गटर रस्ते आवास परिवहन या सारख्या गंभीर समस्या या मुद्दे सोडुन लुंगी पुंगी रसमलाई हिजाब यावर निवडणुक केंद्रित झाल्यामुळे मुंबई सह प्रमुख महानगर पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे सह काँग्रेसला सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला असुन महाविकास आघाडी एकजूट असतीतर महायुतीला रोखण्यात यश आले असते असे मत राजकीय विश्लेषक किशोर तिवारी व्यक्त केले आहे .राज ठाकरे यांनी हटवा लुंगी वाजवा पुंगी वा बिहारी तसेच उत्तर भारतीय लोकांना लाथ मारून बाहेर हाकलून देऊ ही आगाऊ विधाने केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची २० जागा पडल्या तर १५ ठिकाणी काँग्रेस याचा फटका बसला जर उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर असते तर महाराष्ट्रात एमआयएम तसेच इस्लाम पार्टीचा उदय झाला नसता व महायुतीला रोखण्यात यश आले असते असे मत किशोर तिवारी नोंदवित राज ठाकरे व ओवेसी यांनी भाजपचा इशाऱ्यावर हिंदू मुस्लिम मते धर्म भाषेच्या नावावर उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसच्या विरोधात जातील अशा प्रकारे दि...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील गब्बर सेनेची अराजकता भ्रष्टाचार व लूट बंद करावी -किशोर तिवारी

Image
  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील गब्बर सेनेची  अराजकता  भ्रष्टाचार  व लूट बंद करावी  -किशोर तिवारी  दिनांक -५ जानेवारी  २०२५ मागील १० वर्षात यवतमाळ जिल्ह्यात सर्वच विभागात राज्यातील नासलेले भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी निवडून निवडून मोठी रक्कम घेऊन आणण्यात येत असुन सर्वच विभागात त्यातच आरोग्य,मेडीकल कॉलेज खरेदी महसुल ,नगर प्रशासन ,पोलीस ,शिक्षण ,बांधकाम विभाग ,वीज वितरण व आदिवासी विकास या सारख्या महत्वाच्या  विभागात  राज्यातील सर्वात भ्रष्ट अधिकाऱ्यांची फौज आणण्यात येत  असुन लोक निधीची खुली लूट व जनतेवर जुलुम होत आहेंत अशा कठीण काळात यवतमाळ जिल्ह्यात सुरु असलेली गब्बर सेनेची लूट थांबवावी व कारभार आदीवासी उच्चं  शिक्षित डॉ. अशोक उईके याना द्यावा,अशी मागणी शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना केली आहे .  भाजपाला ७ आमदार असतांना मंत्रीपद  मिळाले नाही  भाजपाच्या राष्ट्रीय व राज्य स्तरीय नेत्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे भाजपचे आमदार दोन वेळा पाच पाच निवडून आल...

महाराष्ट्राला केंद्राकडून २० लाख घरे मंजुरीवर श्रेय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मागील दशकात सरकारी योजनेतून मिळालेल्या अपूर्ण ४६ लाख घरांची कामे आधी पूर्ण करावी -किशोर तिवारी

Image
महाराष्ट्राला केंद्राकडून २० लाख घरे मंजुरीवर श्रेय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मागील दशकात सरकारी योजनेतून मिळालेल्या अपूर्ण ४६ लाख घरांची कामे आधी पूर्ण करावी -किशोर तिवारी   दिनांक -२७ डिसेंबर २०२४  https://maharashtrallosabha24.blogspot.com/2024/12/blog-post_26.html सर्व राष्ट्रीय व स्थानीय माध्यमांमध्ये केंद्र सरकारने राज्याला २० लाख पंतप्रधान आवास योजनेत नवी घरे मंजूर केली आहेत त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्यात आले आहे मात्र सरकारी घरकुल योजनेत प्रचंड व्याप्त भ्रष्टाचारामुळे ,तांत्रिक अडचणीमुळे ,सरकारी अनुदान अपुरे असल्यामुळे त्यातच शहरी भागात अडीच लाख रुपये तर ग्रामीण भागात फक्त एक लाख चाळीस हजार रुपये असे सनदी अधिकाऱ्यांच्या मनमानीने आदेश  काढून पहिला हप्ता दिल्यानंतर दुसरा हप्ता वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणारी नासलेली नोकरशाही यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात सुमारे ५० लाख सरकारी वनवास योजनेतील घरे अपूर्ण अवस्थेत आहेत यात जुन्या इंदिरा आवास योजनेच्या २० लाखांवर अपूर्ण घरांचे सापडे आपणास प्रत्येक गावात खेड्यात पोदार  दिसतील यावर नवीन २० लाख घरांच्य...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातुन भ्रष्ट व सेक्सस्टार आमदाराला मंत्री करू नये -किशोर तिवारी

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातुन भ्रष्ट व  सेक्सस्टार आमदाराला मंत्री करू नये -किशोर तिवारी  दिनांक -१३ डिसेंबर २०२४ महायुती ने रामाच्या नावाने अभुतपुर्व यश मिळविले मात्र यवतमाळ जिल्ह्यात सर्वच विभागात राज्यातील नासलेले भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी निवडून निवडून मोठी रक्कम घेऊन आणण्यात आले असुन सर्वच विभागात त्यातच आरोग्य,महसुल ,नगर प्रशासन ,पोलीस ,शिक्षण ,बांधकाम विभाग ,वीज वितरण व आदिवासी विकास या सारख्या महत्वाच्या  विभागात  राज्यातील सर्वात भ्रष्ट अधिकाऱ्यांची फौज आणण्यात आली असुन लोक निधीची खुली लूट व जनतेवर जुलुम होत आहे तरी यवतमाळ जिल्ह्यात शुद्ध चारित्र्याचा "रांडभक्त" न देता चांगला "रामभक्त"    द्यावा ,अशी मागणी शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना केली आहे .  भाजपाला ७ आमदार असतांना मंत्रीपद  मिळाले नाही  भाजपाच्या राष्ट्रीय व राज्य स्तरीय नेत्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे भाजपचे आमदार दोन वेळा पाच पाच निवडून आल्यावरही ते ३० टक्के कमिशन मध्ये खुश असतात असा समज करून त्यां...

"बिहार व आंध्रप्रदेश"सारखे महाराष्ट्राला विशेष पॅकेज ही काळाजी गरज अन्यथा महायुतीचा दयनीय पराभव अटळ -किशोर तिवारी

Image
"बिहार व आंध्रप्रदेश"सारखे  महाराष्ट्राला विशेष पॅकेज ही काळाजी गरज अन्यथा महायुतीचा दयनीय पराभव  अटळ  -किशोर तिवारी  दिनांक -२२ जुलै २०२४ अर्थ मंत्री निर्मला सीतारमन  यांनी सादर केलेले २३-२४चे आर्थिक सर्वेक्षण एक मृगजळ असुन महाराष्ट्र सारख्या राज्याचे दिवाळे निघाले असुन मागील दहा वर्षात  सरकारचे कर्ज सुमारे दोन लाख कोटीवरून चक्क सुमारे आठ लाख झाले असुन केंद्राच्या पंतप्रधान दिव्या स्वप्न असणाऱ्या घराच्या ,पिण्याच्या पाण्याच्या ,आरोग्याच्या ,ग्रामविकासाच्या ,महिला व बाळ कल्याणाच्या ,वीज निर्मिती ,सिंचन क्षमता वाढीसाठी योजना ,निवडणुकीच्या तोंडावर निधी नसतांना १ लाख कोटींची लाडका कंत्राटदार योजना , शिक्षणाच्या ,कृषी क्षेत्राच्या ,समाज कल्याण विभागाच्या  साऱ्या योजना निर्धारित लक्ष्याच्या ५० टक्के सुद्धा पूर्ण झाली नसुन यावर्षी तीन महिन्यावर निवडणुका असल्यामुळें सुमारे दीड  लाख कोटींच्या योजना जर केंद्र सरकारने महाराष्ट्राला सुमारे दोन लाख  कोटीचे विषेय पॅकेज येत्या अर्थ संकल्पात जाहीर केले नाही तर महाराष्ट्राला  अधिकचे कमीत कमी दोन कोटीचे ...

महाराष्ट्रात भाजपाच्या दयनीय पराभवाचे अमित शाह -देवेंद्र फडणवीस हेच शिल्पकार -किशोर तिवारी

Image
महाराष्ट्रात भाजपाच्या दयनीय पराभवाचे अमित शाह -देवेंद्र फडणवीस हेच शिल्पकार -किशोर तिवारी   दिनांक -८ जुन २०२४ महाराष्ट्रात २३ जागांवर विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला दयनीय पराभवाचा सामना करावा लागेल ,ही बाब अत्यंत गंभीर असुन  याची गंभीरता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परीषदेमध्ये ढसा ढसा रडल्यामुळे सिद्ध होते कारण ज्या जागी भाजपाला विजय मिळाला जागी तेथील भाजपाच्या उमेदवारच जबाबदार आहे मोदी-शाह- फडणवीस हा फॅक्टर नव्हता जसे नागपूरचा विजय नितीन गडकरी मुळे ,अकोल्याच्या विजय खासदार व लोकनेते संजय धोत्रे,मुंबई मध्ये पियुष गोयल मूळे ,जळगाव व रावेर एकनाथ खडसे यांच्या कृपेने ,पालघर येथे स्व विष्णू सावरा यांच्या कामामुळे ,पुणे  सीट गिरीश बापट यांच्या पुण्याई व कामामुळे ,नारायण राणे व श्रीमंत उदयनराजे भोसले यांना मिळालेला विजय यामध्ये देवेंद्र फडणवीस वा बावनकुळे यांचा तिळमात्र ही संबंध नाही उलट या नऊ जागांवर अमित शाह यांच्या सुचनेवरून येथील अनेक उमेदवारांना पाडण्याचा सरळ वा छुपा प्रयन्त देवेंद्र - महाजन कंपूने सक्रीयपणे केल्याचे अनेक संघ परिवाराचे लोक उघडपणे सांगतात,या महाराट्रात...

लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपला नाकारले आता तरी कृषी क्षेत्रावर लक्ष द्या -शेतकरी नेते किशोर तिवारी

Image
लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपला नाकारले आता तरी कृषी क्षेत्रावर  लक्ष द्या   -शेतकरी नेते किशोर तिवारी  दिनांक -६ जुन  २०२४ महाराष्ट्रातील ४८ पैकी ३४  मतदार लोकसभा  संघातील शेतकऱ्यांनी २०१४ व २०१९ मध्ये भाजप युतीला भरभरून यश दिले होते त्यातील सर्वच लोकसभा मतदार संघात  भाजप व महायुतीला संपुर्णपणे नाकारल्याचे दिसत आहे शेतकऱ्यांच्या मूळ समस्या ज्या हमीभाव ,लागवडीचा खर्च कमी करणे ,पतपुरवडा,पिकांमध्ये बदल ,सुरळीत शेतकरी धार्जिणा पीकविमा  यावर मागील दशकात झालेली उपेक्षा याचा फटका अनेक भाजपातील    प्रामाणिक लोकनेत्यांनाही बसला असुन यावर आतातरी गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन  विदर्भाचे शेतकरी नेते किशोर तिवारी केले  आहे . महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थ व्यवस्था कृषीवर असणाऱ्या लोकसभा मतदार संघात ज्या ठीकाणी प्रमुखपणे  कापुस सोयाबीन कांदा सह इतर नगदी पीके केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागील तीन वर्षात बाजार भावात आलेली घट त्यामुळे झालेला प्रचंड तोटा तसेच लागवडीच्या खर्चात आलेली प्रचंड वाढ ,उत्पादनात ...