उद्धव ठाकरे व काँग्रेस यांच्या महानगर निवडणुकीत पराभवाला धर्मद्वेष-भाषाद्वेष कारणीभूत ठरला -किशोर तिवारी
उद्धव ठाकरे व काँग्रेस यांच्या महानगर निवडणुकीत पराभवाला धर्मद्वेष-भाषाद्वेष कारणीभूत ठरला -किशोर तिवारी
दिनांक -१८ जानेवारी २०२६
सत्तेच्या दुरुपयोग व पैशाचा पाऊस वरचढ ठरला
यापुर्वी आटोपलेल्या नगरपरिषद व नगर पंचायत निवडणुकीमध्ये महायुतीच्या भाजप व शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार या पक्षांनी प्रत्येक मतदार विकत घेऊन तर मुस्लिम मतदारांना मतदान न करण्यासाठी पैसे वाटुन सर्वच निवडणुका जिंकल्या नंतर आता महानगर पालिका निवडणुकीत मतदाराला विकत न घेता सरळ विरोधकांचे उमेदवारच विकत घेण्याचा "राहुल नार्वेकर पॅटर्न " सुरु करण्यात आलं असुन भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे दिलेली लोकशाहीचे सत्ताधारी पक्ष सरळ सरळ हुकूमशाहीत परिवर्तित करीत असुन भाजपाची बी टीम असलेले ओवेसी व राज ठाकरे हिंदू मुसलमान व मराठी अमराठी हा वाद निवडणुकीमध्ये उपस्थित करून महायुतीच्या पक्षांना निवडणुकीचा मार्ग मोकळा केल्याचे मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले आहे .
बृहन्मुंबईच्या बाहेर "ठाकरे बंधू " अस्तिव शून्य झाले आहेत
हिंदू हृदयसम्राट स्व .बाळासाहेब ठाकरे मुंबईतून अख्ख्या महाराष्ट्रात शिवसेनेचा प्रभाव तयार केला संघटना बांधली मुंबई सतत ३० वर्ष सत्ता कायम ठेवली ती मुंबई आज गौतम अडाणी यांच्या गुलामांच्या हाती लागली आहे त्याच बरोबर कोकण मराठवाडा विदर्भ या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना नामशेष झाली आहे ते सर बाळासाहेबांनी तयार केलेले शिवसैनिक सोडून गेले आहेत याला आदित्य ठाकरे,संजय राऊत,विनायक राऊत व अरविंद सावंत पूर्णपणे जबाबदार असुन उद्धव ठाकरे यांनी आपले पुत्र प्रेम ,परिवार प्रेम ,चांडाळ चौकटी मुक्ती केल्याशिवाय तसेच मातोश्री बाहेर निघाल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही .गौतम अडाणी यांचे कडुन वेळोवेळी देणगी घेणारे तर मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात नाचायला जाणे यामुळे अडाणी -अंबानी विरोध ही एक नूरा कुस्ती दिसत असुन आज प्रमुख विरोधक म्हणुन उद्धव ठाकरे व काँग्रेस संधी असुन त्यांनी भाजपच्या पगारपटावर तसेच देवाभाऊ सोबत मांडवणी करणारे भ्रष्ट नेते दूर सारणे हि काळाची गरज आहे .
================================================================

Comments
Post a Comment