महाराष्ट्रात भाजपाच्या दयनीय पराभवाचे अमित शाह -देवेंद्र फडणवीस हेच शिल्पकार -किशोर तिवारी
महाराष्ट्रात भाजपाच्या दयनीय पराभवाचे अमित शाह -देवेंद्र फडणवीस हेच शिल्पकार -किशोर तिवारी
दिनांक -८ जुन २०२४
महाराष्ट्रात २३ जागांवर विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला दयनीय पराभवाचा सामना करावा लागेल ,ही बाब अत्यंत गंभीर असुन याची गंभीरता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परीषदेमध्ये ढसा ढसा रडल्यामुळे सिद्ध होते कारण ज्या जागी भाजपाला विजय मिळाला जागी तेथील भाजपाच्या उमेदवारच जबाबदार आहे मोदी-शाह- फडणवीस हा फॅक्टर नव्हता जसे नागपूरचा विजय नितीन गडकरी मुळे ,अकोल्याच्या विजय खासदार व लोकनेते संजय धोत्रे,मुंबई मध्ये पियुष गोयल मूळे ,जळगाव व रावेर एकनाथ खडसे यांच्या कृपेने ,पालघर येथे स्व विष्णू सावरा यांच्या कामामुळे ,पुणे सीट गिरीश बापट यांच्या पुण्याई व कामामुळे ,नारायण राणे व श्रीमंत उदयनराजे भोसले यांना मिळालेला विजय यामध्ये देवेंद्र फडणवीस वा बावनकुळे यांचा तिळमात्र ही संबंध नाही उलट या नऊ जागांवर अमित शाह यांच्या सुचनेवरून येथील अनेक उमेदवारांना पाडण्याचा सरळ वा छुपा प्रयन्त देवेंद्र - महाजन कंपूने सक्रीयपणे केल्याचे अनेक संघ परिवाराचे लोक उघडपणे सांगतात,या महाराट्रात भाजपाच्या वा महायुतीच्या पराभवाचे खरे शिल्पकार अमित शाह -देवेंद्र फडणवीस असुन ,येत्या विधान सभेच्या निवडणुकीत तर भाजपला जनसंघाचे दिवस अमित शाह -देवेंद्र फडणवीस ही जोडी दाखविणार असा विश्वास मागील अख्खे आयुष्य संघ -जनसंघात राहीलेले शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे .
देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची मस्ती व दुरुपयोग ,अंहकार ,अडाणी लक्ष्मी वर्षावामुळे महाराष्ट्राची भाजपाची संपुर्ण ऐशीतैशी
२०१४ पुर्वी नैतिकचे प्रतीक असलेले व सार्वजनिक जीवनात एक आदर्श लोकनेते अमर्यादित सत्ता व दिल्लीचा वरदहस्त मिळतो त्यावेळी विनम्रता कशी लोप पावते ,व्यक्ती द्वेष व भ्रष्टाचार व दलाल संस्कृती कशी एखाद्या राजनेत्याची लोकप्रियता अति अल्पकाळात धुळीस मिळते याचे साक्षात पंगत उदाहरण माझे कनिष्ठ बंधु देवेंद्र आहेत व माझा देवेंद्र हा आशिष शेलार ,गिरीश महाजन व राम कदम सारख्या xxxखाऊ कमिशनखोर नेत्यामुळे झाला त्यामध्ये परिणय फुके ,भारतीय सह वानखेडे यानीही खारीचा वाटा उचलला आहे . सत्तेचा तुकडा फेकुन अदानीच्या पैशावर ईडी ,सीबीआय यांचा सर्रास दुरुपयोग करून पक्ष फोडणे हे महाराष्ट्राच्या लोकांना आवडले नाही व भाजपला उघडपणे नाकारले मात्र हा सर्व देवेंद्रचा झालेला रास माझ्या वडीलांचे जवळचे मित्र स्व गंगाधरराव फडणवीस यांना काय वाटत असेल ,असा सवाल किशोर तिवारी केला आहे .
५ हजार कोटीचा बाजार मांडुन सरकार पाडणे व अजित पवार यांची सलगी अंगलट आली
२०१४ पुर्वी पोटभरू भ्रष्टाचारी नेत्यांविरुद्ध रणशिंग फुकणाऱ्या व आपल्या बुलंद संघर्षाने मुख्यमंत्री अशोक चव्हाण ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध सरकारला सडेकीपडो करणाऱ्या आपल्या प्रतिमेवर एकही शिंतोडा येणार नाही याची सतत काळजी घेणाऱ्या व इतरांसाठी आदर्श असलेल्या देवेंद्र फडणवीस सारख्या लोकनेत्यावर सत्ता येताच झालेला बदल अभूतपूर्व होता . भांडवलदारांची चाकरी करणाऱ्या अमित शहांच्या आदर्श सेवक होऊन महाराष्ट्राला पक्ष शिस्त व स्वछ राजकारणाची भाजपची परंपरा फर्रास रोडवर ठेवल्यामुळे या लोकनेत्याला याची भरपूर किंमत मोजावी लागेल कारण सत्तेच्या बाजारात सगळे चालत असेल मात्र पुरोगामी महाराष्ट्राचा समाज या दंभाची कठोर शिक्षा देणार असा विश्वास किशोर तिवारी यांनी व्यक्त केला आहे
==============================
Comments
Post a Comment