मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील गब्बर सेनेची अराजकता भ्रष्टाचार व लूट बंद करावी -किशोर तिवारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील गब्बर सेनेची अराजकता भ्रष्टाचार व लूट बंद करावी -किशोर तिवारी
दिनांक -५ जानेवारी २०२५
भाजपाला ७ आमदार असतांना मंत्रीपद मिळाले नाही
भाजपाच्या राष्ट्रीय व राज्य स्तरीय नेत्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे भाजपचे आमदार दोन वेळा पाच पाच निवडून आल्यावरही ते ३० टक्के कमिशन मध्ये खुश असतात असा समज करून त्यांना मागील वेळेस पालक मंत्री दिले नाही त्यामुळे सडक्या व नासलेल्या पैसे मोजणाऱ्या व जनतेचे खिस्से कापणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यवतमाळ जिल्ह्यात महापुर आला आहे व हि घाण जिल्ह्याच्या बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यातील दहशत संपवून अधिकाऱ्यांच्या उरावर बसुन टक्केवारी वसुली करणारी गब्बरसेना हद्दपार करणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांनां केले आहे . जे आमदार पैसे देऊन मंत्री होतात व अति मागास आदिवासी शेतकरी आत्महत्यांसाठी जगात कुप्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात आपला नंगानाच करतात हा प्रकार सर्व आमदारांनी पहिला आहे
"पूजा बेटीच्या"आत्म्याला शांतीसाठी व यवतमाळ जिल्ह्यात महिलांना अभय देण्यासाठी गब्बर सेनेचा आतंक समाप्त करा
ज्यावेळी गब्बर सेनेच्या सरदाराला आपण सत्तेत घेतले त्याचवेळी नेर वरून अमरावतीला जाऊन गब्बर सेनेच्या नेत्यांनी आपल्याच महीला नेत्याचे चीर हरण केली असाच प्रकार सतत जिल्ह्यत वारंवार होत आहे मागील दहा वर्षात गब्बर सेनेचे सर्व सेनापती यांनी सरकारी तिजोरी कोट्यवधींची खुली लूट केली आहे .सध्या जिल्ह्यात ६० टक्के पदे रिक्त पडली असुन अधिकारी कारकून शिक्षक पटवारी चपराशी याना मोठी रक्कम दिल्याशिवाय जिल्ह्यात नियुक्ती मिळत नाही सारे मीडियावाले सुद्धा या अत्याचार लिहताना विचार करतात ही वस्तूस्थिती आहे भाजपाच्या महिलाचा अधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या आमदार चित्राताई वाघ यांनी पूजाला न्याय देण्याचा घेतलेला प्रण पूर्ण करण्यासाठी पूजा बेटाच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी तसेच "प्रिया ताई " यांचे वर पुन्हा नव्याने हल्ले टाळण्यासाठी तसेच मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या आदर्शावर चालणाऱ्या नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या व भारताला महाशक्ती करणाऱ्या चारित्र्य संपन्न पक्षांच्या नेत्यांनी यवतमाळ जिल्ह्यातपुन्हा गब्बर सेनेला संधी देऊ नये त्यामुळे जिल्ह्यात आई भगीनी अभयपणे राहू शकतील ,अशी कळकळीची विनंती किशोर तिवारी यांनी आपल्या पत्रात केले आहे .
===============================================================

Comments
Post a Comment