लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपला नाकारले आता तरी कृषी क्षेत्रावर लक्ष द्या -शेतकरी नेते किशोर तिवारी
लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपला नाकारले आता तरी कृषी क्षेत्रावर लक्ष द्या -शेतकरी नेते किशोर तिवारी
दिनांक -६ जुन २०२४
महाराष्ट्रातील ४८ पैकी ३४ मतदार लोकसभा संघातील शेतकऱ्यांनी २०१४ व २०१९ मध्ये भाजप युतीला भरभरून यश दिले होते त्यातील सर्वच लोकसभा मतदार संघात भाजप व महायुतीला संपुर्णपणे नाकारल्याचे दिसत आहे शेतकऱ्यांच्या मूळ समस्या ज्या हमीभाव ,लागवडीचा खर्च कमी करणे ,पतपुरवडा,पिकांमध्ये बदल ,सुरळीत शेतकरी धार्जिणा पीकविमा यावर मागील दशकात झालेली उपेक्षा याचा फटका अनेक भाजपातील प्रामाणिक लोकनेत्यांनाही बसला असुन यावर आतातरी गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विदर्भाचे शेतकरी नेते किशोर तिवारी केले आहे .
महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थ व्यवस्था कृषीवर असणाऱ्या लोकसभा मतदार संघात ज्या ठीकाणी प्रमुखपणे कापुस सोयाबीन कांदा सह इतर नगदी पीके केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागील तीन वर्षात बाजार भावात आलेली घट त्यामुळे झालेला प्रचंड तोटा तसेच लागवडीच्या खर्चात आलेली प्रचंड वाढ ,उत्पादनात आलेली घट ,आरोग्य व शिक्षणावर झालेली प्रचंड वाढ तसेच व्यवसायिक शिक्षण घेऊन ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात या १० वर्षात निर्माण झालेली बेरोजगारांची फौज यामुळे शेतकऱी शेतमजूर भाजपावर प्रचंड प्रमाणात नाराज होते व ही नाराजी ४ जूनला स्पष्ट झाली असा दावा किशोर तिवारी यांनी केला आहे
मागील दशकात विकर्मी ३२८४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कापुस सोयाबीन कांदा तेल व डाळीचे उत्पादक शेतकऱ्यांच्या मूळप्रश्न बियांचे नवीन जाती ,नवीन तंत्र तसेच लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी ठोस काम ,शेतकऱ्यांना सरकारी बंकाकडून वेळेवर मुबलक पीक कर्ज ,लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा देणारा हमीभाव ,पीक पद्धतीमध्ये डाळ पीक ,कड धान्य ,तेल बियांचे पेरा यावर लागवडीसाठी विशेष अनुदान ,गाव स्तरावर प्रक्रिया तंत्र ,शेतकरी उत्पादक संघाचे जाळे ,ग्रामीण महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी यावर मागील १० वर्षात काम न केल्यामुळे तसेच येणाऱ्या पंच वार्षीक मध्ये सुद्धा या कृषी संकटाच्या मूळ प्रश्नावर भाजपा संकल्प पत्रात कोणतीही चर्चा नसल्यामुळे भाजपा वरील प्रेम प्रचंड प्रमाणात नाराजीमध्ये परिवर्तीत झाले असून हि बाब देशात अनेक भागात कमी अधिक प्रमाणात दिसली अशी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देतांना शेतकरी नेते किशोर तिवारी व्यक्त केले आहे .
================================================================

Comments
Post a Comment