मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातुन भ्रष्ट व सेक्सस्टार आमदाराला मंत्री करू नये -किशोर तिवारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातुन भ्रष्ट व  सेक्सस्टार आमदाराला मंत्री करू नये -किशोर तिवारी 

दिनांक -१३ डिसेंबर २०२४

महायुती ने रामाच्या नावाने अभुतपुर्व यश मिळविले मात्र यवतमाळ जिल्ह्यात सर्वच विभागात राज्यातील नासलेले भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी निवडून निवडून मोठी रक्कम घेऊन आणण्यात आले असुन सर्वच विभागात त्यातच आरोग्य,महसुल ,नगर प्रशासन ,पोलीस ,शिक्षण ,बांधकाम विभाग ,वीज वितरण व आदिवासी विकास या सारख्या महत्वाच्या विभागात राज्यातील सर्वात भ्रष्ट अधिकाऱ्यांची फौज आणण्यात आली असुन लोक निधीची खुली लूट व जनतेवर जुलुम होत आहे तरी यवतमाळ जिल्ह्यात शुद्ध चारित्र्याचा "रांडभक्त" न देता चांगला "रामभक्त"  द्यावा ,अशी मागणी शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना केली आहे . 

भाजपाला ७ आमदार असतांना मंत्रीपद  मिळाले नाही 

भाजपाच्या राष्ट्रीय व राज्य स्तरीय नेत्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे भाजपचे आमदार दोन वेळा पाच पाच निवडून आल्यावरही ते ३० टक्के कमिशन मध्ये खुश असतात असा समज करून त्यांना मागील वेळेस पालक मंत्री दिले नाही त्यामुळे सडक्या व नासलेल्या पैसे मोजणाऱ्या व जनतेचे खिस्से कापणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यवतमाळ जिल्ह्यात महापुर आलेला आहे व हि घाण जिल्ह्याच्या बाहेर काढण्यासाठी भ्रष्ट आमदारांना मंत्रिपद नाकारणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांनां केले आहे . 

"पूजा -प्रिया" कांडांची पुनरावृत्ती व चित्रा वाघ  यांच्या संघर्ष टाळा 

भाजपाच्या महिला अधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या आमदार चित्राताई वाघ यांनी पूजाला न्याय देण्याचा घेतलेला प्रण पूर्ण करण्यासाठी पूजा बेटाच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी तसेच "प्रिया ताई " यांचे वर पुन्हा नव्याने हल्ले टाळण्यासाठी तसेच मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या आदर्शावर चालणाऱ्या नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या व भारताला महाशक्ती करणाऱ्या चारित्र्य संपन्न पक्षांच्या नेत्यांनी यवतमाळ जिल्ह्यात 'रांडभक्तांना' संधी देऊ नये त्यामुळे जिल्ह्यात आई भगीनी अभयपणे राहू शकतील ,अशी कळकळीची विनंती किशोर तिवारी यांनी आपल्या पत्रात केले आहे . 

===============================================================

Comments

Popular posts from this blog

उद्धव ठाकरे व काँग्रेस यांच्या महानगर निवडणुकीत पराभवाला धर्मद्वेष-भाषाद्वेष कारणीभूत ठरला -किशोर तिवारी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातील गब्बर सेनेची अराजकता भ्रष्टाचार व लूट बंद करावी -किशोर तिवारी

महाराष्ट्रात भाजपाच्या दयनीय पराभवाचे अमित शाह -देवेंद्र फडणवीस हेच शिल्पकार -किशोर तिवारी