लोकसभा २०२४ जनादेश- भाजपा सरकारला महाराष्ट्राच्या कापुस सोयाबीन उत्पादकांचा नाराजी भोवणार -शेतकरी नेते किशोर तिवारी
लोकसभा २०२४ जनादेश- भाजपा सरकारला महाराष्ट्राच्या कापुस सोयाबीन उत्पादकांचा नाराजी भोवणार -शेतकरी नेते किशोर तिवारी
दिनांक -३ जुन २०२४
महाराष्ट्रातील विदर्भ ,मराठवाडा ,खान्देश, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराट्रातील ३१ मतदार लोकसभा संघातील शेतकऱ्यांनी २०१४ व २०१९ मध्ये भाजप युतीला भरभरून यश दिले होते त्यातील सर्वच मतदार संघात सारेच एक्सिट पोल व मतदानाचा कल भाजपच्या महायुतीला नाकारत असल्याचे व भाजपाच्या कापुस सोयाबीन उत्पादकांची उपेक्षा ईव्हीएम द्वारे प्रगत होणार व याचा फटका महाराष्ट्रातील या भागातून निवडणूक लढत असलेले सर्व केंद्रीय व राज्याच्या मंत्री व प्रामाणिक लोकनेत्यांनाही बसणार असा विश्वास विदर्भाचे शेतकरी नेते किशोर तिवारी व्यक्त केले आहे .
महाराष्ट्रातील विदर्भ ,मराठवाडा ,खान्देश, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराट्रातील काही लोकसभा मतदार संघ ज्या ठिकाणी ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कापुस सोयाबीन पिकांवर अवलंबून आहे त्या क्षेत्रात कापुस सोयाबीन सह इतर नगदी पिकांवर मागील तीन वर्षात बाजार भावात आलेली घट त्यामुळे झालेला प्रचंड तोटा तसेच लागवडीच्या खर्चात आलेली प्रचंड वाढ ,उत्पादन आलेली घट ,आरोग्य व शिक्षणावर झालेली प्रचंड वाढ तसेच व्यवसायिक शिक्षण घेऊन ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात या १० वर्षात निर्माण झालेली बेरोजगारांची फौज यामुळे शेतकऱी शेतमजूर भाजपावर प्रचंड प्रमाणात नाराज आहेत व ही नाराजी ४ जूनला दुपार पर्यंत स्पष्ट होईल असा दावा किशोर तिवारी यांनी केला
मागील दशकात विकर्मी ३२८४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मूळप्रश्न बियांचे नवीन जाती ,नवीन तंत्र तसेच लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी ,शेतकऱ्यांना सरकारी बंकाकडून वेळेवर मुबलक पीक कर्ज ,लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा देणारा हमीभाव ,पीक पद्धतीमध्ये डाळ पीक ,कड धान्य ,तेल बियांचे पेरा यावर लागवडीसाठी विशेष अनुदान ,गाव स्तरावर प्रक्रिया तंत्र ,शेतकरी उत्पादक संघाचे जाळे ,ग्रामीण महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी यावर मागील १० वर्षात कोणतेच ठोस काम न केल्यामुळे तसेच येणाऱ्या पंच वार्षीक मध्ये सुद्धा या कृषी संकटाच्या मूळ प्रश्नावर भाजपा संकल्प पत्रात कोणतीही चर्चा नसल्यामुळे भाजपा वरील प्रेम प्रचंड प्रमाणात नाराजीमध्ये परिवर्तीत झाले असून हि बाब महाराष्ट्रात प्रामुख्याने ४ जूनला दिसेल असे भाकीत शेतकरी नेते किशोर तिवारी व्यक्त केले आहे .
================================================================

Comments
Post a Comment