महायुती सरकारची कापुस सोयाबीन भावांतर योजना हा देवेंद्र फडणवीस यांचा नवीन जुमला -शेतकरी नेते किशोर तिवारी

 महायुती सरकारची  कापुस सोयाबीन भावांतर योजना हा देवेंद्र फडणवीस यांचा नवीन जुमला   -शेतकरी नेते किशोर तिवारी 

दिनांक -२३ एप्रिल २०२४

ज्या मोदी सरकारने मध्यप्रदेश राज्यातील भावांतर योजना म्हणजे हमी भाव व बाजार भाव यातील फरक देण्याची योजना जबरीने बंद पाडली ती भावांतर योजना मोदी सरकार आल्यास कशी काय सुरु ठेवणार त्यामुळेच महाराष्ट्रातील विदर्भ ,मराठवाडा ,खान्देश, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराट्रातील ३१ लोकसभा मतदार संघात पराभव दिसत असतांना चतुर चाण्यक्य देवेंद्र फडणवीस आचार संहिता सुरु असतांना घोषीत केलेली कापूस सोयाबीन भावांतर योजना हा एक जुमला असुन जो पर्यंत ३१ मतदार लोकसभा  संघातील शेतकरी मोदी यांचा शेतकरी विरोधी  धोरणाचा विरोध ईव्हीएम द्वारे दाखविणार तोपर्यन्त केंद्राचे गुलाम राज्यात शेतकऱ्यांच्या वेदना समजत नाही असे स्पष्ट मत विदर्भाचे शेतकरी नेते किशोर तिवारी व्यक्त केले  आहे .


महाराष्ट्रातील विदर्भ ,मराठवाडा ,खान्देश, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराट्रातील काही लोकसभा मतदार संघ ज्या ठिकाणी ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कापुस सोयाबीन पिकांवर अवलंबून आहे त्या क्षेत्रात कापुस सोयाबीन सह इतर नगदी  पिकांवर मागील तीन वर्षात बाजार भावात आलेली घट त्यामुळे झालेला प्रचंड तोटा तसेच लागवडीच्या खर्चात आलेली प्रचंड वाढ ,उत्पादन आलेली घट ,आरोग्य व  शिक्षणावर झालेली प्रचंड वाढ तसेच व्यवसायिक शिक्षण घेऊन ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात या १० वर्षात निर्माण झालेली बेरोजगारांची फौज यामुळे शेतकऱी शेतमजूर भाजपावर प्रचंड प्रमाणात नाराज आहे व मार्च २०१४ पासून मार्च २०२४ पर्यंत महाराष्ट्रातील या पट्टयात ३२८४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कापुस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मूळप्रश्न बियांचे नवीन जाती ,नवीन तंत्र तसेच लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी ,शेतकऱ्यांना सरकारी बंकाकडून वेळेवर मुबलक पीक कर्ज ,लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा देणारा हमीभाव ,पीक पद्धतीमध्ये डाळ पीक ,कड धान्य ,तेल बियांचे पेरा यावर लागवडीसाठी विशेष अनुदान ,गाव स्तरावर प्रक्रिया तंत्र ,शेतकरी उत्पादक संघाचे जाळे ,ग्रामीण महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी यावर मागील १० वर्षात कोणतेच ठोस काम न केल्यामुळे तसेच येणाऱ्या पंच वार्षीक मध्ये सुद्धा या कृषी संकटाच्या मूळ प्रश्नावर भाजपा संकल्प पत्रात कोणतीही चर्चा नसल्यामुळे भाजपा वरील प्रेम प्रचंड प्रमाणात नाराजीमध्ये परिवर्तीत झाले असून निवणुकीच्या प्रचारात सुध्दा पंतप्रधान या गंभीर विषयावर एकही शब्द्ध आपल्या भाषणात बोलत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीमध्ये भर पडत आहे या नाराजीमुळे महाराष्ट्रातील कमीत कमी ३० मतदार संघात महायुतीला फटका बसणार असुन भाजपचे अनेक नेते पराभवाच्या खाईत भाजपचे स्टार प्रचारक टाकत असल्याची खंत मोदींसाठी २०१४ व २०१९ खुले समर्थन  देऊन प्रचार करणारे विदर्भाचे शेतकरी नेते किशोर तिवारी व्यक्त केली आहे . 

काँग्रेसच्या पाच गॅरंटी मध्ये शेतकऱ्यांना दिलासा 

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये हमीभाव हा घटनात्मक अधिकार ,सर्व शेतकऱ्यांवरील संपूर्ण पीक कर्ज माफ ,आदीवासी शेतकऱ्यांना  एका वर्षात पट्टे , बेरोजगारांना वार्षिक १ लाख रुपये तसेच कुटुंबातील एका महीला सदयसला वार्षिक १ लाख रुपये ,दवाखान्यासाठी २५ लाख रुपये तसेच रोजगार हमी योजनेची मजुरी ४०० रुपये रोज करण्याची घोषणा यामुळे महाराष्ट्रात मरणासन्न
झालेली काँग्रेसचे चांगले दिवस महाराष्ट्रातील शेतकरी आणतील असे चित्र पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचा निवडणुकीत दिसत असल्याचा दावा  
किशोर तिवारी व्यक्त केली आहे . 

=========================================

Comments

Popular posts from this blog

महायुती सरकारची कापुस सोयाबीन भावांतर योजना हा देवेंद्र फडणवीस यांचा नवीन जुमला -शेतकरी नेते किशोर तिवारी