Posts

Showing posts from June, 2024

महाराष्ट्रात भाजपाच्या दयनीय पराभवाचे अमित शाह -देवेंद्र फडणवीस हेच शिल्पकार -किशोर तिवारी

Image
महाराष्ट्रात भाजपाच्या दयनीय पराभवाचे अमित शाह -देवेंद्र फडणवीस हेच शिल्पकार -किशोर तिवारी   दिनांक -८ जुन २०२४ महाराष्ट्रात २३ जागांवर विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला दयनीय पराभवाचा सामना करावा लागेल ,ही बाब अत्यंत गंभीर असुन  याची गंभीरता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परीषदेमध्ये ढसा ढसा रडल्यामुळे सिद्ध होते कारण ज्या जागी भाजपाला विजय मिळाला जागी तेथील भाजपाच्या उमेदवारच जबाबदार आहे मोदी-शाह- फडणवीस हा फॅक्टर नव्हता जसे नागपूरचा विजय नितीन गडकरी मुळे ,अकोल्याच्या विजय खासदार व लोकनेते संजय धोत्रे,मुंबई मध्ये पियुष गोयल मूळे ,जळगाव व रावेर एकनाथ खडसे यांच्या कृपेने ,पालघर येथे स्व विष्णू सावरा यांच्या कामामुळे ,पुणे  सीट गिरीश बापट यांच्या पुण्याई व कामामुळे ,नारायण राणे व श्रीमंत उदयनराजे भोसले यांना मिळालेला विजय यामध्ये देवेंद्र फडणवीस वा बावनकुळे यांचा तिळमात्र ही संबंध नाही उलट या नऊ जागांवर अमित शाह यांच्या सुचनेवरून येथील अनेक उमेदवारांना पाडण्याचा सरळ वा छुपा प्रयन्त देवेंद्र - महाजन कंपूने सक्रीयपणे केल्याचे अनेक संघ परिवाराचे लोक उघडपणे सांगतात,या महाराट्रात...

लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपला नाकारले आता तरी कृषी क्षेत्रावर लक्ष द्या -शेतकरी नेते किशोर तिवारी

Image
लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपला नाकारले आता तरी कृषी क्षेत्रावर  लक्ष द्या   -शेतकरी नेते किशोर तिवारी  दिनांक -६ जुन  २०२४ महाराष्ट्रातील ४८ पैकी ३४  मतदार लोकसभा  संघातील शेतकऱ्यांनी २०१४ व २०१९ मध्ये भाजप युतीला भरभरून यश दिले होते त्यातील सर्वच लोकसभा मतदार संघात  भाजप व महायुतीला संपुर्णपणे नाकारल्याचे दिसत आहे शेतकऱ्यांच्या मूळ समस्या ज्या हमीभाव ,लागवडीचा खर्च कमी करणे ,पतपुरवडा,पिकांमध्ये बदल ,सुरळीत शेतकरी धार्जिणा पीकविमा  यावर मागील दशकात झालेली उपेक्षा याचा फटका अनेक भाजपातील    प्रामाणिक लोकनेत्यांनाही बसला असुन यावर आतातरी गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन  विदर्भाचे शेतकरी नेते किशोर तिवारी केले  आहे . महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थ व्यवस्था कृषीवर असणाऱ्या लोकसभा मतदार संघात ज्या ठीकाणी प्रमुखपणे  कापुस सोयाबीन कांदा सह इतर नगदी पीके केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागील तीन वर्षात बाजार भावात आलेली घट त्यामुळे झालेला प्रचंड तोटा तसेच लागवडीच्या खर्चात आलेली प्रचंड वाढ ,उत्पादनात ...

लोकसभा २०२४ जनादेश- भाजपा सरकारला महाराष्ट्राच्या कापुस सोयाबीन उत्पादकांचा नाराजी भोवणार -शेतकरी नेते किशोर तिवारी

Image
लोकसभा २०२४ जनादेश- भाजपा  सरकारला महाराष्ट्राच्या  कापुस सोयाबीन उत्पादकांचा नाराजी भोवणार -शेतकरी नेते किशोर तिवारी  दिनांक -३ जुन  २०२४ महाराष्ट्रातील विदर्भ ,मराठवाडा ,खान्देश, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराट्रातील ३१ मतदार लोकसभा  संघातील शेतकऱ्यांनी २०१४ व २०१९ मध्ये भाजप युतीला भरभरून यश दिले होते त्यातील सर्वच मतदार संघात सारेच एक्सिट पोल व मतदानाचा कल भाजपच्या महायुतीला नाकारत असल्याचे व भाजपाच्या कापुस सोयाबीन उत्पादकांची उपेक्षा  ईव्हीएम द्वारे प्रगत होणार व याचा फटका महाराष्ट्रातील या भागातून निवडणूक लढत असलेले सर्व केंद्रीय व राज्याच्या मंत्री व प्रामाणिक लोकनेत्यांनाही बसणार असा विश्वास विदर्भाचे शेतकरी नेते किशोर तिवारी व्यक्त केले  आहे . महाराष्ट्रातील विदर्भ ,मराठवाडा ,खान्देश, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराट्रातील काही लोकसभा मतदार संघ ज्या ठिकाणी ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कापुस सोयाबीन पिकांवर अवलंबून आहे त्या क्षेत्रात कापुस सोयाबीन सह इतर नगदी  पिकांवर मागील तीन वर्षात बाजार भावात आलेली घट त्यामुळे झालेला प्रचंड तोटा तसे...