Posts

Showing posts from January, 2026

उद्धव ठाकरे व काँग्रेस यांच्या महानगर निवडणुकीत पराभवाला धर्मद्वेष-भाषाद्वेष कारणीभूत ठरला -किशोर तिवारी

Image
उद्धव ठाकरे व काँग्रेस यांच्या महानगर निवडणुकीत पराभवाला  धर्मद्वेष-भाषाद्वेष कारणीभूत ठरला -किशोर तिवारी  दिनांक -१८ जानेवारी २०२६ महानगर निवडणुकीत नळ गटर रस्ते आवास परिवहन या सारख्या गंभीर समस्या या मुद्दे सोडुन लुंगी पुंगी रसमलाई हिजाब यावर निवडणुक केंद्रित झाल्यामुळे मुंबई सह प्रमुख महानगर पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे सह काँग्रेसला सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला असुन महाविकास आघाडी एकजूट असतीतर महायुतीला रोखण्यात यश आले असते असे मत राजकीय विश्लेषक किशोर तिवारी व्यक्त केले आहे .राज ठाकरे यांनी हटवा लुंगी वाजवा पुंगी वा बिहारी तसेच उत्तर भारतीय लोकांना लाथ मारून बाहेर हाकलून देऊ ही आगाऊ विधाने केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची २० जागा पडल्या तर १५ ठिकाणी काँग्रेस याचा फटका बसला जर उद्धव ठाकरे काँग्रेस बरोबर असते तर महाराष्ट्रात एमआयएम तसेच इस्लाम पार्टीचा उदय झाला नसता व महायुतीला रोखण्यात यश आले असते असे मत किशोर तिवारी नोंदवित राज ठाकरे व ओवेसी यांनी भाजपचा इशाऱ्यावर हिंदू मुस्लिम मते धर्म भाषेच्या नावावर उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसच्या विरोधात जातील अशा प्रकारे दि...